लहानपण देगा देवा

पवार, संयोगिता

लहानपण देगा देवा - १ ली - पुणे संवेदना प्रकाशन 2023 - 112p

मधुजा चव्हाण

संकीर्ण , लहानपण देगा देवा -बालपण हे प्रत्येकास लाभतं. जन्मानंतरची ही प्रथमावस्था. तुकोबाराय म्हणतात, 'लहानपण देगा देवा! मुंगी साखरेचा रवा ।।' या दृष्टान्त अलंकारापेक्षा बालपण विलक्षण वेगळं आहे. लहानपण हे आपण मोठेपणी स्वीकारलं, तर मनासारखा लाभ होतो. 'ऐरावत रत्न थोर । त्यास अंकुशाचा मार ।।' हा दृष्टान्त भ्रामक मोठेपणावर घाव घालणारा आहे. प्रस्तुत लहानपणीच्या आठवणी लेखिका संयोगिता पवार यांनी नम्रपणे लहानपण स्वीकारून मित्र मैत्रिणी, शालेय जीवन, शिक्षकवर्ग आदी विषयांवर अत्यंत जिव्हाळ्यानं हे ललितबंध चितारले आहेत. मागे वळून पाहताना त्यांनी वाचकांपुढे हे बालस्मृतिचित्रांचे 'प्रगतिपुस्तक' नम्रपणे ठेवलंय. कमीत कमी शब्दांत विषयवस्तू सार्थपणे खुलवणं, ओघवता विचार आणि प्रतिभासंपन्न प्रज्ञाविलास खरोखरच वाचनीय झालाय. रसिकांस हे पुस्तक वाचताना बालपणीच्या विविध चवींच्या आस्वादक घटना नक्कीच पुनःप्रत्ययाचा आनंद देतील. वर्तमानाशी जमवून घेताना भूतकाळातील प्रसंग आपल्या वैचारिक मोठेपणाची जाणीव करून देतात. 'लहानपण देगा देवा' ही विनम्र विनवणी करायला सांगणारी ऐतिहासिक साहित्यकृती आहे.




मराठी

9789391307981


संकीर्ण


लहानपण देगा देवा

संकीर्ण ४८२६३/१५१७८७ / 48263