TY - BOOK AU - राशिंगकर,सुधीर TI - कॉर्पोरेट गुरु मुकेश अंबानी SN - 9789352204250 U1 - चरित्र ४८२६६/१५१७९० PY - 2023/// CY - संभाजी नगर PB - साकेत प्रकाशन KW - चरित्र KW - कॉर्पोरेट गुरु मुकेश अंबानी N1 - मधुजा चव्हाण; ललित वितरण बील नं १२१ दि - २४/१०/२०२३ N2 - चरित्र , कॉर्पोरेट गुरु मुकेश अंबानी - “सर्वाधिक स्वस्त, तरीही गुणवत्तेने श्रेष्ठ वस्तूंचे उत्पादन करणे हा माझा शब्द आहे.” - मुकेश अंबानी एखादा विश्वव्यापी उद्योग उभारण्यामागे कित्येक पिढ्यांची दूरदृष्टी वा मेहनत असते. मात्र एक नव्हे तर असे अनेक प्रचंड उद्योगसमूह उभारण्याचे कार्य मुकेश अंबानी यांनी केले आहे. वयाच्या 18 व्या वर्षीच कंपनीच्या संचालक मंडळावर नियुक्त झालेल्या मुकेश यांनी वडिलांच्या आग्रहाखातर अमेरिकेतील उच्च शिक्षण अर्धवट सोडले. लगेचच रिलायन्स कंपनीच्या पाताळगंगा इथल्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या उभारणीचे काम वयाच्या विशीतच यशस्वीरीत्या पूर्ण केले. वडील धीरूभाई अंबानी यांच्या निधनामुळे त्यांनी कंपनीचा कारभार हाती घेतला. नंतरच्या काही दशकांत त्यांनी विविध क्षेत्रांतील उद्योगात पर्दापण करून जगातील सर्वोत्कृष्ट कंपनीच्या यादीत वरचा क्रमांक पटकावला. निष्ठावंत अधिकारी आणि कर्मचार्यांची मोठी फळी त्यांनी उभारली. त्याचबरोबर क्रीडा, पर्यावरण, सेवाभावी कार्य, शिक्षण क्षेत्र यामध्येही मोलाचे योगदान दिले. विशेष म्हणजे आपल्या पत्नीला आणि पुढच्या पिढीलाही हे सर्व कार्य पुढे नेण्यासाठी घडवले. हे सर्व त्यांनी कसे घडवून आणले, कोणती व्यवस्थापन सूत्रे वापरली, त्यांच्या यशाच्या कार्यपद्धती काय आणि तरुण पिढीला ते कोणता संदेश देऊ इच्छितात याविषयी कॉर्पोरेट गुरू ‘मुकेश अंबानी’ या पुस्तकातून जाणून घ्या. प्रथितयश लेखक डॉ. सुधीर राशिंगकर यांनी ते इथे ओघवत्या शैलीत विस्तृतपणे सांगितले आहे ER -